shodh khitijacha

सहज मनात आले आणि कागदावर उतरवले अशा स्वरुपाच्या माझ्या लिखाणाला blogs आणि मनोगत यांच्या निमित्ताने व्यासपीठ मिळाले. वाचकांनी आपल्या सुचना/पसंती/नापसंती निःसंकोचपणे कळवावी.

Name:
Location: maharashtra

hmmm check urself!

Tuesday, October 03, 2006

हूरहूर

सुर्य मावळताना मन हुरहुरते....
का?
ते आता समजले,
माझे माणुस निघाले
आयुष्याच्या मावळतीला तेव्हा.
पण.......
सुर्य तर पुन्हा उगवणार असतो.

Thursday, July 20, 2006

Google Groups Subscribe to AUXEL PROJECT FOR BLIND PEOPLE and be part of the biggest service project on Earth to eradicate blindness before 2nd nov 2008!
Email:
Browse Archives of conversation on the auxel project's group
Browse Archives of conversation on the auxel project's Software Development group
Browse Archives of conversation on the auxel project's Hardware Development group

इथे जगतोय कोण?

प्रिय पाडगावकर विचारताहेत
कधीपासुन
सांगा कसं जगणार?
कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
प्रश्न एकच
इथे जगतोय कोण?

यंत्रच तर आहेत सगळी रोजच्या नियमांची.
सण समारंभ गाठीभेटी या होत्या उत्साहाच्या गोष्टी

त्यांचेही रुपांतर झाले यांत्रिकतेत, देखाव्यात
इथे जगतोय कोण?
जगणं हा आनंद उपभोगायचा असतो स्वच्छंदपणे

मनाची कवाडे उघडी ठेऊन
मोकळा वारा आत घेउन
आज तर आहेत सारीच कवाडं बन्द आणि
तो वारा ही महाग झालाय.
आता आहेत फक्त प्रदुषणं

आम्हीच निर्मिलेल्या भ्रष्ट्राचाराची
आणि.....
मुलांना शिकवताहेत हे लहानपणापासुनच
दुटप्पी धोरण, स्वार्थीव्रुत्ती, 'मी'पण
आणि नितीमत्ता शिष्टाचारांची.
जणु हेच जगणं, हेच माणुसपण
मुलही मग मोठं होतं,
त्याला शिकवलेल्या माणुसपणाला जागतं.
मग सांगा
ते तरी काय उत्तर देणार या प्रश्नाला?
सांगा कसं जगणार?

कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?

Wednesday, July 19, 2006

माझं दुःख

माझं दुःख घट्ट दाबुन धरलेमी
प्रयत्नपुर्वक
जाणिवपुर्वक
पण...
प्रत्येकवेळी आलं कुणीतरी
माझ्यावरच्या प्रेमापोटी किंवा सहानुभुती ही जगाची रित म्हणुनही
माझी जखम मात्र पुन्हा ओली झाली
त्यांचा हात पाठीवर पडल्यावर
आणि शब्द कानावर
आणि मग
पुन्हा प्रयत्न सुरु ती दाबुन धरायचे
ती भळभळतेय हे
स्वःताला सुद्धा कळु नये म्हणुन.

Saturday, May 27, 2006

आज सकाळपासुनच ढगाळ पावसाळी वातावरण होतं. काल पावसाने हलकासा शिडकावा केला होताच,त्यामुळे मनं सकाळपासुनच पावसाची वाट पहात होतं. कामं उरकता उरकता खिडकीतुन आभळाकडे पाहुन आढावा नकळतच घेतला जात होता.
आज पाऊस येणार
आज पाऊस येणार
गेल्या काही दिवसातल्या सुर्याच्या उष्णतेने लाही-लाही झालेली धरणी या शितल शिडकाव्याची आतुरतेने वाट पहात होती. आणि मीसुद्धा!
नकळत मिलिंदच्या गारवातल्या ओळी गुणगुणु लागले, ग़ा...रवा!!
विज आणि पावसाची मैत्री सर्वद्यात आहेच. त्यामुळे कृत्रिम झाली म्हणुन काय झालं? घरातली विज(सकाळचे अडीच तास सोडुन) ३ ते ४ वेळा पावसाच्या स्वागताला जाऊन आली!
दुपारनंतर छान वारा सुटला. माझी क्लिनीकला जायची वेळ होत आली होती. रेनसुट काढावा की नाही म्हणत मी रेंगाळत होते, इतक्यात वारा आडवा तिडवा वहायला लागला. ढगांचा गडगडाट,विजांचा कडकडाट असा साग्रसंगीत कार्यक्रम सुरु झाला. मी आनंदुन गेले.
आणि बघता बघता आडवा तिडवा जोरदार पाऊस सुरु झाला. मृदगंध छातीत भरुन घेताना मनाचे समाधान होइना.
गा..रवा
पाऊस जरा कमी झाल्यावर निघाले. विचार केला आज निवांत पाऊस अनुभवत जाऊया! रेनसुट वगैरे चढवुन आमची स्वारी निघाली. सोसायटीतुन बाहेर येऊन रोडला लागतानाच तांबड्या पाण्याचा खळाळता लोंढा स्वागताला तयार! मी त्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघाले,
गा..रवा!
थोडं पुढे येताच एक बहाद्दर स्कुटर हातात घेऊन वाहनांना न जुमानता रस्त्यातुन आडवा पळत चालला होता. कचकचुन ब्रेक दाबताना मागचं चाक लटपटलं.
अरे!!!म्हणत मनात उठ्णाऱ्या चिडक्या तरंगांना मी दाबलं.
गा..रवा!
मग सिग्नलवर पुन्हा पाण्याचा पाट. हिरव्या दिव्याची प्रतिक्षा करत थंड वाऱ्याचा झोत अनुभवत मीही सुखावत होते, इतक्यात एक आठ-नऊ वर्षांची चिमुरडी (भिकारी म्हणवत नाही) आपल्या दिड दोन वर्षांच्या भावाला छातीशी धरुन त्या पाण्याच्या लोंढ्यातुन पलिकडे जाताना दिसली. तिच्या अंगावर रेनकोट वगैरे नव्हता, लहानग्याच्या अंगावर तत्सम काहीतरी होते. मी माझ्या रेनसुट वरुन एकदा नजर फिरवली.
गा..रवा!
हं....
सिग्नल सुटला (की मी?). आमची स्वारी पुढे निघाली. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला( की रस्त्यावर) डावीकडे गटाराचं काळं पाणी वरच्या झाकणाला न जुमानता रस्त्यावर वहात होतं. त्यांची घाण आणि वासं!!
गा..रवा!
झालं.
आणखी पुढे गेलो तर आमच्या स्वागताला खोदलेला रस्ता, मातीचा ढिग, उरल्या- सुरल्या रस्त्यावर मातीचा निसरडा चिखल!
गा..रवा!
रस्ता काही संपत नव्हता. पुढे रस्त्याच्या एका कोपऱ्यावर छोट्याश्या गोलात वाढवलेली हिरवळ पाहुन मनाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला.
गा..रवा!
मी स्वातःलाच बजावल!
निराशावादी विचार नको. घाण, गटारे, चिखल, माती, गरीबी, दारिद्र्य आणि भिकारी याकडे तु पाहु नको.
छान पहिला पाऊस अनुभव,
सुखद गारवा,
थंड वारा,
मृदगंध व्यापी आसमंत सारा.
सु(?)खद पहिला पाऊस अनुभवावा!!!!!!!

Saturday, May 20, 2006

कुंपण

आज आजुबाजुला पाहताना
मला फक्त कुंपण दिसतात
भली मोठी
मनाला लावलेली प्रत्येकाच्या.
ती तटबंदी लावुन सुखावतात हे लोक----
आता मी सुरक्षित (?) आहे
'मी'पणाला चिकटुन बसतात
त्या पिंजऱ्यात
स्वताच लावलेल्या कुंपणाच्या.
पहातात मग माझ्याकडे
विचित्रपणे किंवा तुच्छतेनेही
डोळ्यांवरच्या त्या झापडांच्या कक्षेतुन-
एवढी कशी ही वेडी
कि आहे काहीतरी खोडी?
मग मीही म्हणते जाऊ दे
मला मोकळा श्वास घेऊ दे
नाहीतरी यांची प्रेमं
ती ही आहेत बेगडी!

Saturday, May 13, 2006

अश्रु

अश्रु
मनातलं काहुर
डोक्यातलं काहुर
तुंबळ युद्ध वा नुसतीच हुरहुर
डोळ्यांना चाहुल
फुटे अश्रुंना पाउल
नुसतेच साश्रु नयन
तर कधी मुक ओघळ
कधी मात्र फुटे बांध
त्यंचा जणु महापुर
सामावुन घेतात
दुखांचा सागर
म्हणुनच कि काय
त्यंची चवही असते खारट!!

अश्रु-1

अश्रु
अश्रु निर्माण करतानानिसर्गाला तरी समजले असेल का?
किती महत्त्वाची भेट देतोयतो मानवाला!!
अश्रु--एक अनमोल भेट.
काय सांगत नाहीत हे अश्रु?
किती रुपं, किती प्रसंग आणि किती अर्थ!

साश्रु नयंनापासुन तर कोसळणाऱ्या बांधापर्यंत
अश्रुच खरे सोबती असतात
काही एकट्या.... अगदी एकट्या समयी
गर्दी असते अवती भवती माणसांचीपण...
सोबती नसतो कुणीच
अशावेळी अश्रु सोबत करतात
अलगद तरळुन डोळ्यात किंवा ओघळतात अबोलपणे गालांवरुन
आणि सांगतात-आम्ही आहोत ना!!
ऐकुन घेतात शांतपणेआपली सारी व्यथा आणि पोकळ समजुतींच्या शब्दांचा मुलामा द्यायचा प्रयत्न करीत नाहीत.
देतात फक्त सोबत तीच तर हवे असते नाहीतरी त्या क्षणी सर्वांत जास्त!
मनात दटलेल सारं मळभ दुर करतात
गच्च आभाळासारखं मन, रितं करतात
हलकं करतात आपल्याला.
होतात आपले दुत कधीआपली भावना पोहचवायला.
शब्द फुटतच नाही तोंडातुन
किंवा बोलु शकत नसतो आपण..
काही कारणाने.

असाच तरललेला एक अश्रु डोळ्यातला
सांगतो आपल्या माणसालाआणी तेही फक्त आपल्याच माणसाला
आपल्या मनीचे भाव.

रुतलेला एखादा वाग्बाणकिंवा खोचक बोलणी
कधी मुक क्ऱुतद्न्यता तर कधी अपार आनंद, ओथंबलेलं प्रेम
किती भावनांची पोच देतो आपला एकच अश्रु!
ओघळतो अचानक कधीतरी नको असताना सुद्धा..
पण......तीही गरजचं असते, त्या क्षणी.

काही करणाने मिटुन गेलेली व्यक्ती जेंव्हा दुरावते अश्रुंना,
प्रयत्न करतो आपण, अश्रु यावेत म्हणुन
त्या व्यक्तीला मोकळं करण्यासाठी साचलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी.
अश्रु हे सोबती!
अश्रु ही देणगी!